शालेय पोषण आहार लेखापरिक्षण २०-२१ ते २३-२४

Contents

शालेय पोषण आहार लेखापरिक्षण २०-२१ ते २३-२४ |shaley poshan aahar lekha parikshan 20-21 te 23-24 with faq

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालयस्तरावरुन शाळांना विविध प्रकारचे अनुदान वितरीत करण्यात येते आहे. शाळांना वितरीत करण्यात आलेल्या अनुदानाचा विनियोग नियमानुसार होणे आवश्यक असते. शाळा, तालुका व जिल्हास्तरावर योजनेची अंमलबजावणी करतांना सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाचे लेखापरिक्षण करणे करीता शिंदे, चव्हाण गांधी & कंपनी, पुणे या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सदर संस्थेमार्फत सन २०२० – २१ ते सन २०२३ – २४ या चार वर्षाच्या कालावधीतील शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचेकडील प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या अभिलेख्यांचे लेखा परिक्षण करण्यात येणार आहे. सदरच्या लेखापरिक्षण कार्यवाहीकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांचे लेखापरिक्षण करण्यात येणार असल्याने, योजनेस पात्र शाळांना सोबत जोडण्यात आलेला विहित नमुना (वेब फॉर्म) उपलब्ध करुन देण्यात यावा.

शाळांनी सदरची माहिती भरतांना शाळेकडील उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य, अचूक व वस्तुनिष्ठ माहिती भरावी.

READ this  maha mid day meal three course meal 2024

सदरची माहिती शाळांनी केवळ एक वेळेस भरावयाची आहे. त्यामुळे माहिती भरतांना योग्य ती दक्षता शाळाप्रमुख / मुख्याध्यापक यांनी घेणे आवश्यक आहे.

शाळा, तालुका व जिल्ह्यांना माहिती भरण्याकरीता व आढावा घेण्याकरीता ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याकरीता तालुका व जिल्ह्यांचे लॉगिन आयडी व पासवर्ड जिल्ह्यांना कळविण्यात येतील.

शाळांनी अचूकपणे विहित नमुना (वेव फॉर्म) यामध्ये भरलेली माहिती सर्व तालुक्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या https://block.mahamdm2-scgc.co.in या ऑनलाईन पोर्टलवर शाळानिहाय भरावयाची आहे. तसेच शाळांकडून संकलित माहितीची एक प्रत तालुकास्तरावर जतन करुन ठेवण्यात यावी.

सदर संस्थेमार्फत टप्प्याटप्याने विविध जिल्ह्यांचे लेखापरिक्षण करण्यात येणार आहे. तालुकानिहाय लेखापरिक्षणाचा कार्यक्रम जिल्ह्यांना कळविण्यात येईल. क्षेत्रीयस्तरावर शाळांकडील अभिलेख्यांचे शाळानिहाय माहितीचा विहित नमुना (वेव फॉर्म) व प्रत्यक्ष अभिलेख्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

प्रस्तुत लेखापरिक्षणाकरीता शाळांकडून कोणत्याही स्वरुपाची फी (Free Of Cost) आकारण्यात येणार नसल्याने, शाळांनी लेखापरिक्षणाकरीता कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा फि देण्यात येऊ नये, याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणांना अवगत करण्यात येऊन तशा सूचना सर्व शाळांना देण्यात याव्यात.

लेखापरिक्षणाकरीता विहित नमुन्यातील माहिती सर्व शाळांनी देणे अनिवार्य आहे. लेखापरिक्षणास माहिती सादर न करणे अथवा लेखापरिक्षण पडताळणी दरम्यान अभिलेखे सादर न करणा-या शाळाप्रमुखांकडून लेखाविषयक नियमानुसार दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी व याबाबत सर्व शाळांना अवगत करुन देण्यात यावे.

लेखापरिक्षणाकरीता तालुका व जिल्ह्यांशी आवश्यक समन्वय साधण्याकरीता, तालुका व जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांचे संपर्क क्रमांक संबंधित संस्थेस mdmaudit@cascg.in या ई- मेलवर त्वरीत कळविण्यात यावेत.

शाळांकडून लेखापरिक्षण नमुना प्रपत्र भरुन घेतांना खालील आवश्यक अभिलेख्यांचा तपशिल खालीलप्रमाणे.

अ. बँक पासबुक – सन २०२०-२१ ते सन २०२३ २४ पर्यंत

आ. सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ पर्यंतचे कॅशबुकचा तपशिल

इ.सन २०२०-२१ ते सन २०२३ २४ या कालावधीतील तांदुळ साठा नोंदवही इतर धान्यादी माल शिल्लक

ई.सन २०२०-२१ ते सन २०२३ २४ या कालावधीतील तांदूळ खर्च विवरण नोंदवही

सन २०२० – २१ ते सन २०२३ २४ या कालावधीत शासन खाती भरणा करण्यात आलेल्या रकमांच्या चलनांच्या छायांकित प्रत

उ. सर्व प्रकारचे खर्चाचे व्हाऊचर्स, उपयोगिता प्रमाणपत्रे, विद्यार्थी आरोग्य तपासणी विवरण

ऊ. याव्यतिरिक्त लेखापरिक्षण नमुना प्रपत्राच्या अनुषंगाने इतर आवश्यक अभिलेखे व विहित नमुन्यातील

READ this  तीन संरचित आहार पाककृतींमध्ये सुधारणा|maha mid day meal three course meal 2024 improvement

हस्तलिखित भरलेला नमुना (Hard copy of web form)

११. लेखापरिक्षणाकरीता निर्गमित करण्यात आलेल्या नमुन्यातील माहिती शाळांकडून संकलित करुन वेबसाईटवर भरणेची सुविधा तालुक्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तालुक्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या लॉगिनवरुन शाळानिहाय माहिती अद्यावत करावयाची आहे.

१२. जिल्ह्यांनी तालुक्यांच्या लेखापरिक्षणा विषयक कामकाजाचा नियमितपणे आढावा घेऊन सर्व शाळांची माहिती भरणेबाबत योग्य ते नियोजन करावे तसेच याबाबत सर्व तालुक्यांना आवश्यत ती दक्षता घेण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात. जिल्ह्यातील सर्व शाळांचे लेखापरिक्षण होण्याच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची राहील.

१३. जिल्ह्यातील ज्या शाळा लेखापरिक्षणास उपस्थित राहणार नाहीत अथवा अभिलेखे सादर करणार नाहीत, अशा शाळांवर दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याबाबतचे गांभीर्य सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अवगत करुन देण्यात यावेत.

उक्त निर्देश शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळणा-या सर्व शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपालिका यांना लागू राहतील.

(सदर माहिती प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या शासन निर्णय नुसार आहे ) pdf येथून डाउनलोड करू शकता

FAQ

१. ओपनिंग बॅलन्स म्हणजे काय?

चालू वर्षाची ओपनिंग बॅलन्स म्हणजे गेल्या वर्षीची क्लोजिंग बॅलन्स.

उदाहरण: -२०१९-२० या कालावधीसाठी ३१ मार्चचा, क्लोजिंग बॅलन्स २०२०-२१ या कालावधीसाठी ०१ एप्रिल, ओपनिंग बॅलन्स म्हणून गृहीत धरले जाईल.

२. बँक व्यवहारात प्रवेश करताना प्राप्त अनुदान व्यवहार प्रकारात काय नोंदवतील?

अनुदान प्राप्त झालेले त्या त्या हेड ला जमेची व खर्चाची नोंद करावी.

उ.दा. इंधन व भाजीपाला, स्वयंपाकी अनुदान, शिक्षक अनुदान, बँकेत मिळालेलं व्याज, स्टेशनरी व भांडी खरेदी, बँक चार्जेस याची नोंद इतर अनुदानात करावी

प्राप्त अनुदानात त्या व्यवहारांची नोंद करतील जे वरील सूचीमध्ये नोंदवले जाऊ शकत नाहीत.

या व्यतिरिक्त आलेल्या अनुदानाची नोंद हि प्राप्त अनुदानात करावी.

वरील प्रमाणे आलेले अनुदान व खर्ची नोंद करावी.

३. बँक व्यवहारात प्रवेश करताना इतर उत्पन्न / खर्च व्यवहार प्रकारात काय नोंदवले जातील?

इतर खर्च हे सर्व उत्पन्न/खर्च नोंदवतील जे प्रिंटिंग आणि स्टेशनरी, भांडी खरेदी केली व इतर खर्च असल्यास किंवा मिड डे मील योजनेशी संबंधित असलेला कोणताही खर्च.

४. बँक / कॅश बुक नोंद करताना निगेटिव्ह बॅलन्स आला तर काय कराल?

जमा व खर्च याची योग्य त्या प्रमाणे नोंद झाली आहे का? ते तपासावे आणि महिन्याच्या शेवटी कॅश / बँक बुकची शिल्लक रक्कम तपासून पाहावी, ती बरोबर आहे किंवा नाही त्याची पडताळणी करावी, जर तो बॅलन्स चुकीचा असेल तर बरोबर करून घ्यावा. त्या नंतर तो पॉप-अप निघून जाईल.

READ this  maha mdm app download and use

५. बँक व्यवहार रेकॉर्ड करताना केलेल्या नोंदी कशा बदलायच्या / हटवायच्या?

i) रेकॉर्ड केलेले व्यवहार टेबलच्या खालील बाजूस दिसतील- “एंटर केलेले बँक व्यवहार”.

ii) एंट्रीमध्ये बदल करण्यासाठी, रेकॉर्ड केलेल्या व्यवहाराच्या बाजूला असलेल्या लाल रंगात ‘X’ चिन्हावर क्लिक करून, तुम्हाला प्रथम एंट्री डिलीट करावी लागेल.

iii) डिलीट केलेली एंट्री पुन्हा रेकॉर्ड करण्यासाठी पुन्हा प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

६. योजनेतून लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कशी भरायची?

सारणीच्या सर्वात वरच्या स्तंभावर नमूद केलेल्या संबंधित वर्षासाठी वार्षिक आधारावर रक्कम प्रविष्ट करणे आवश्यक आहे (उदा: – ०१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च- २०२१). इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांची संख्या स्वतंत्रपणे प्रविष्ट करावी. १ली ते ५ वी आणि इयत्ता ६वी ते ८वी पर्यंतचे विद्यार्थी.

७.विद्यार्थी संख्या कशी? कोठून घ्यावी? (प्रत्येक वर्षाची समरी करून देण्यात यावी)

१ली ते ५ वी व ६वी ते ८वी असे दोन तक्ते करावेत.

अ.नु.वर्षपटावर असलेली
विद्यार्थी संख्या
लाभार्थी विद्यार्थ्य विद्यार्थी संख्या
12020-21
22021-22
32022-23
42023-24

८. तांदळाच्या ओपनिंग स्टॉकमध्ये काय भरायचे?

मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशी बंद होणारा स्टॉक चालू वर्षाच्या पहिल्या दिवशी ओपनिंग स्टॉक होईल. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच संबंधित वर्षाच्या १ एप्रिल रोजीचा स्टॉकचा मोजमाप असा आकडा प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

९. तांदळाच्या स्टॉक ची समरी कशी द्याल? (आरंभीचा साठा १ एप्रिल व अखेरचा साठा ३१ मार्च) प्रत्येक वर्षाची माहिती खालील प्रमाणे द्यावी.

अ.नु. वर्षआरंभीची साठाआलेला साठावापरलेला साठाअखेरचा साठा
2020-21
2021-22
2022-23
2023-24

१०. डॉक्युमेंट कोणते, किती साईझ मध्ये अपलोड करावेत?

फक्त स्वाक्षरी आणि शिक्का असलेला मॅन्युअली भरलेला फॉर्म अपलोड करावा लागेल. अपलोड करताना फाईलचा आकार १० एमबीपेक्षा कमी असावा.

११. लेखापरीक्षणाच्या वेळी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

1. बँक पासबुक

2. कॅशबुक

3. स्टॉक बुक (तांदूळ आणि इतर)

४. चलन (सरकारी खात्यात जमा झालेली रक्कम)

5. व्हाउचर फाइल

6. वेब फॉर्म

7. उपयोगिता प्रमाणपत्र (फॉर्म बी)

12. झालेल्या लेखापरीक्षणाची पावती ?

लेखापरीक्षण पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल जिल्हा स्तरावर सादर केला जाईल.

3 thoughts on “शालेय पोषण आहार लेखापरिक्षण २०-२१ ते २३-२४”

Leave a Reply